आस्था बेघर निवारा केंद्राचा वर्धापन दिन

दिनांक:- 26 /1/ 2024           

                        केंद्रशासनन पुरस्कृत राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान सातारा नगरपरिषद सातारा अंतर्गत गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने आस्था बेघर  निवारा केंद्राच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले

             या कार्यक्रमात सातारा नगरपरिषद एन यु एल एम विभागाचे प्रमुख सौ. कीर्ती साळुंखे,सौ गीतांजली गायकवाड, सौ आरती जोशी ,तसेच राजधानी शहर स्तर संघ अध्यक्ष व पदाधिकारी, इनरव्हील  क्लब ऑफ  सातारा कॅम्पच्या अध्यक्ष निना महाजन , क्लब एडिटर मिनाज मुलानी   व पदाधिकारी, गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री कौशिक कुलकर्णी कुलकर्णी व सर्व पदाधिकारी, श्री दुर्वास कोदे (आरोग्य विभाग संचनालय पुणे )डॉ. शरद दराडे. सल्लागार, (राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम आरोग्य विभाग संचालनालय,  पुणे) श्री साळुंखे सर तसेच देणगीदार व सर्व सन्माननीय मान्यवर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला

            मान्यवरांच्या हस्ते  दीपप्रज्वलन,  प्रार्थना व पृथ्वी पूजन  करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नगरपरिषद एन यु एल एम विभागाच्या सौ. कीर्ती साळुंखे  यांनी प्रस्ताविक केले ,पल्लवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तसेच सर्व पदाधिकारी मान्यवर सत्कार समारंभ करण्यात आला.

                  प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, नागरी व जीएसटी सुविधा केंद्राचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट  संचलित आस्था  बेघर निवारा  केंद्रातर्फे   वर्धापन दिनाचा कार्यक्रम   उत्तमरित्या पार पाडण्यात आला.