जागतीक बेघर दिन १०/१०/२०२३

जागतीक बेघर दिन हा प्रत्येक वर्षी दहा ऑक्टोबर रोजी साजरा होत असतो याचे औचित्य साधत गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आस्था बेघर निवारण केंद्र आणि सातारा नगरपरिषद सातारा यांच्या संयुक्तविध्यमाणे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शनिवार पेठ येथील गजानन मंगल कार्यालय येथे जागतिक बेघर दिनाचे कार्यक्रम आयोजत करण्यात आले होते या कार्यक्रमात इनर्व्हील क्लब सातारा,छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि जकातवाडी येथील यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क चे विध्यार्थी आणि प्राध्यापकांनी सक्रीय सहभाग नोंदविला. सकाळी अकरा वाजता माण्यावरांच्या हस्ते दिप प्रजवलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या वेळी आस्था बेघर निवारण केंद्रा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ही करण्यात आले होते यात अनेक स्वयंसेवकांनी रक्तदान केले,त्याच प्रमाणे बेघर निवारण केंद्रातील आश्रित निराधार लोकांनी विविध संस्कृतीक कार्यक्रम सादर केले यात हिंदी चित्रपटातील गाणी ,पारंपरिक ओवी, जात्यावरील गाण्यांचा समावेश होता,समाजात वृद्ध व्यक्ती कडे ओझे म्हणून पाहण्याचा दृष्टकोन वाढत चालला आहे